होम ई-पेपर
सर्व बातम्यांकडे परत
होम / मुंबई
मुंबई

नानगाव येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम सम्पन्न

दौंड प्रतिनिधी दि.१९ टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत नानगाव येथील जिल्हा परिषद शाळेत क्षयरोग जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. क्षयरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासोबतच आजाराची लक्षणे, संभाव्य धोके, उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत क्षयरोग जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. काळकुटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यकमात निरामय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, स्पिला मेडिसिन कं. व ओलंपिया ट्रस्ट यांचा सहयोग लाभला.

Admin By Admin 🕒 28 Aug 2026 • 14:18 आपला बळीराजा
नानगाव येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम सम्पन्न
दौंड प्रतिनिधी दि.१९ टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत नानगाव येथील जिल्हा परिषद शाळेत क्षयरोग जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. क्षयरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासोबतच आजाराची लक्षणे, संभाव्य धोके, उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत क्षयरोग जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. काळकुटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यकमात निरामय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, स्पिला मेडिसिन कं. व ओलंपिया ट्रस्ट यांचा सहयोग लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेश थोरात होते. यावेळी दौंड तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधून इसा, नासा आणि इस्रो येथे निवड झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये शिवन्या कोंडे (इसा), स्पृहा शितोळे (इसा), सुदर्शन शितोळे (नासा), क्षितिज चव्हाण (नासा), आरती चव्हाण (इस्रो) आणि श्रावणी काळे (इस्रो) यांचा समावेश आहे. या विध्यार्थ्यांना या आंतरिक्ष संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य गणेश थोरात व डॉ. गायत्री खळदकर यांनी केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुका अध्यक्ष नितीन दोरगे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. गायत्री खळदकर, सागर शेलार, साहेबराव पोळ, पंचायत समिती सदस्य प्रदीप दिवेकर, मनीषा ताकवणे, शिवाजी ढमाले, धनंजय शेळके, संजय भोसले, बाळासाहेब निवंगुणे, कात्रज दूध संघाचे संचालक सागर फडके, राहुल दिवेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, लक्ष्मण दिवेकर, सुभाष बोत्रे, शिवाजी वाघोले, सचिन शेळके, विश्वासराव भोसले, शीतल शिंदे, चंद्रकांत खळदकर, विशाल शेलार, उत्तमराव ताकवले,पांडुरंग खळदकर, डॉ. विशाल खळदकर, आदी मान्यवर तसेच डॉ. अनिकेत उघडे व डॉ. सौरभ कोरेकर हे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद खळदकर व शिवाजी लोंढे यांनी केले.तर आभार डॉ. गायत्री खळदकर यांनी मानले.
!